
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात तालुका आढावा सभा संपन्न झाली,यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर ,भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे,माजी सभापती प्रकाश वाकडे,भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, महिला आघाडी अध्यक्ष मायाताई ननावरे, निलेश गभने सौ आशा मेश्राम दुर्गा सातपुते ,सुरज नरुले व बीडीओ राठोड उपस्थित होते,
गावातील घरकुल ,सभागृह, स्मशानभूमी, रस्ते आदी समस्या वर चर्चा प्रत्येक सरपंच यांनी व्यक्त केली असता त्यावर शासकीय अधिकारी,कर्मचारी यांचे कडून उत्तर घेण्यात आले,तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.