
१६ आगस्ट शहीद दिनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करणार-आमदार बंटीभाऊ भांगडीया
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर क्रांती भुमी चे स्वप्न बघितले आहेत. ते पूर्ण करीत असताना अनेक स्वप्न पूर्ण झाले. चिमूर नगर परिषद, सुसज्ज पोलीस स्टेशन निर्माण करणे असे स्वप्न पूर्ण केले असून चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणारच अशी ग्वाही आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की विरोधक विरोध करीत असले तरी जनतेच्या आशीर्वादाने आपल्या समस्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा शब्द देत सातत्याने पत्र व्यवहार करीत असताना घरकुल मंजुरीसाठी विलंब, पाणी पुरवठा योजनेस विलंब झाली कारण विरोधकांनी अडचणी निर्माण केल्या होत्या.परंतु अखेर ६९३ लाभार्थ्यांना मंजुरी मिळविण्यासाठी यश आले असल्याचे सांगत घरकुल च्या अटी शर्ती पूर्ण करून कोणतीही अडचण त्रास न देता घरकूल बांधकाम सुरू करण्याची सक्त सूचना देत अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरू झाले असतांनाही विरोधाकानी विरोध केला होता.
परंतु येत्या १६ आगस्ट २२ ला अतिरिक्त जिल्हा कार्यालय सुरू करण्याचे विश्वास गव्हाई दिली,चिमूर नगर परिषद आयोजित अभ्यंकर मैदान वरील सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ६९३ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश वाटप कार्यक्रमात उद्घाटक आमदार बंटी भांगडीया बोलत होते,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश संकपाल , भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, माजी सभापती प्रकाश वाकडे, चिमूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अध्यक्ष हेमराज दांडेकर,माजी नप सभापती सतीश जाधव ,भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे,समीर राचलवार, भाजप तालुका महामंत्री प्रशांत चीडे, भाजयुमो शहर अध्यक्ष बंटी वनकर श्रेयश लाखे अमित जुमडे अशोकबापू कामडी संजय कुंभारे ,माजी नप सभापती भारती गोडे ,ललिता चौधरी, दुर्गा सातपुते आशा मेश्राम समीना शेख मुख्याधिकारी दिनेश पवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक नप चे राजेश मिश्रा तर संचालन विकास नखाते तर आभार सतीश जाधव यांनी व्यक्त केले .घरकुल लाभार्थी उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमात कैलास धनोरे ,गोलू भरडकर भूषण सातपुते सुरज नरुले, शुभम भोपे, राजू बोडणे,फारुख शेख ,गुणवंत चटपकर नितेश दोडके, मनोज सोगलकर भूषण डाहुले प्रफुल डांगे सुद्धा उपस्थित होते.