Breaking News

15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 12 जुलै : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून 15 जुलै 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत शारीरिक क्षमता चाचणी या विषयावर फिजीकल करीअर अकादमीचे संचालक रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्रमांक 5 व 6 येथे आयोजित या सत्रात पोलिस उपनिरीक्षक, सैन्यभरती, पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी या सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता 07172- 252295 या क्रमांकावर संपर्क साधावा.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांची रॅली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी निमसरकारी …

तिसऱ्या दिवशी कार्यालये ओस पडली,कार्यालयात शुकशुकाट

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved