Breaking News

वारक-यांच्या वाहनांना पथकरातून सूट

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 12 जुलै : आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात, त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानांवर 7 ते 15 जुलै 2022 या कालावधीत वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकातून सूट देण्याचे शासनाचे आदेश आहेत.

त्यामुळे संबंधित वाहन मालकाने पथकरातून सूट घेण्यासाठी विहित नमुन्यात उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे. त्याकरीता सदर कार्यालयात सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. भाविकांनी व वारक-यांनी या सवलतीचा फायदा घेण्यासाठी वाहनाच्या वैध कागदपत्रांसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करावा व प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर

= लेखा परीक्षण अहवालानुसार घोटाळा बाहेर = माजी व्यवस्थापक व मुख्य लीपिकाचा प्रताप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल …

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त रक्तदात्यांना फळ व टिफिनचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर पाथरी:- आज दिनांक 2/10/22 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved