काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर यांच्या आरोप
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर शहरातील जुना प्रभाग क्रमांक चार मधिल राजीव गांधी नगर येथील हनुमान मंदिर समोरील शिक्षक कालोनी येथे पावसाळा सुरू झाला तेव्हापासून या खाली जगेवार पाऊसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात खूप साचून आहे, नगर परिषदेला वारंवार कितीवेळा सुचना दिल्या असून नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे,
साचलेल्या पाण्यापासून तेथील नागरिकांना खुपच त्रास सहन करावा लागत आहे, जर या दोन दिवसात नगर परिषदने पाणी मार्ग लावला नाही तर होणाऱ्या कोणतीही जीवितहानीस किवा रोगराई पसरण्यावर जबाबदार नगर परिषद राहतील असे आरोप तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर यांनी केले आहे.