
प्रतिनिधी कैलास राखडे
नागभीड:- येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. अंकुश कायरकर यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील वनस्पतीशास्त्र विभागात ते कार्यरत आहे. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 109 व्या दीक्षांत समारंभात आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. डॉ. नितीन डोंगरवार, विभाग प्रमुख, वनस्पतीशासत्र विभाग, रा. तू. म. नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी “इंवेस्टीगेशन ऑन मायकोफ्लोरा असोसिएटेड विथ सम स्पिसीस ऑफ ह्याबेण्यारिया (ऑर्किड्यासी)” याविषयावर आपले संशोधन पूर्ण केले. डॉ. के. एच. माकडे, डॉ. आर. पी. ठाकरे, डॉ. एम. एन. भजभुजे व डॉ. उमा ठाकुर यांनी केलेल्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनाचा त्यांच्या यशात मोलाचा वाटा आहे,
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी संस्थेचे सचिव मा. मनोजभाऊ वनमाळी व संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जि. डी. देशमुख, मार्गदर्शक डॉ. नितीन डोंगरवार त्याच बरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. विकास मोहतुरे, डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. आर. जे. रुडे, प्रा. निलेश गोडे, डॉ. मनीष मत्ते, डॉ. अतुल नागपुरे, प्रा. चक्रधर भुर्रे यांना दिले आहे. आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जि. डी. देशमुख व महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.