
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दिनांक ४ ऑगस्ट ‛चिमूर क्रांती भूमीत १६ ऑगस्ट ला संपन्न होणाऱ्या शहीद स्मृती दिन सोहळ्यानिमित्त’ आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे नियोजनात्मक आढावा बैठक संपन्न झाली, सदर,
बैठकीमध्ये शहीद स्मृती दिन सोहळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली आणि चिमूर क्रांती नगरीत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने तत्पर रहावे याकरिता विविध सूचना दिल्या.
यावेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ सर, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे मॅडम, एसडीपीओ सांगळे सर, पीआय गभने सर, बिडिओ राठोड सर, बीओ नाट सर, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता उपगंडलावार सर व इतर प्रशासकीय अधिकारी,
तसेच भाजपाचे पदाधिकारी राजू पाटील झाडे, वसंतभाऊ वारजूकर, राजूभाऊ देवतळे, निलमभाऊ राचलवार, सतीश जाधव यावेळी उपस्थित होते.