
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शिवसेना जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका तर्फे आयोजित, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपसानी शिबीर पहिला दिवस हनुमान मंदिर बोरगाव( बांद्रा ) येथे घेण्यात आले.
त्यावेळी उपस्थित मान्यवर शिवसेना माजी तालुका प्रमुख वरोरा सुधाकरभाऊ मिलमिले, शिवसेना माजी नगरसेवक वरोरा दिनेशभाऊ यादव, कंत्राटी कर्मचारी सेना तालुका प्रमुख हनुमानभाऊ ठेंगणे,शिवसेना शाखा प्रमुख विलासभाऊ काळे,शिवसैनिक अतुलभाऊ नांदे,सर्व शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका व समस्त गावकरी उपस्थित होते.
तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी बोरगाव येथील शिवसैनिकांशी संवाद साधून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली आहे.