
भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केले अभिवादन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर-भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतिवीर स्वातंत्र्य साठी शहीद झाले असून अमर शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारक व अभ्यंकर मैदानावरील हुतात्मा स्मारक, शहीद बालाजी रायपूरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरकास पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, तालुका महामंत्री प्रशांत चिडे, डॉ. हेमंत जांभूळे, हेमराज दांडेकर, तसेच रमेश कंचर्लावार, जयंत गौरकर, कैलास धनोरे, राकेश कामडी ,प्रकाश बोकारे, अरुण लोहकरे, विकी कोरेकर, सौ.आशा मेश्राम, सौ.दुर्गा सातपुते, सौ. गीता लिंगायत, सौ.भारती गोडे, समीना शेख, सौ. अरुणा ननावरे आदि उपस्थित होते.