
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी-डॉ.विणा काकडे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- आज दिनांक १२ ऑगस्ट २०२२ ला आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये परिसर स्वछता, जनजागृतीपर रॅली, व्याख्यानमाला आणि वृक्षारोपण असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसर स्वच्छतेमध्ये महाविद्यालय परिसर प्लास्टिक मुक्त करणे, कचरा साफ करणे, झाडू मारणे, ध्वजस्तंभाजवळील परिसर स्वच्छ करणे इत्यादी कामे करण्यात आली,
महाविद्यालयातुन रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हर घर तिरंगा या अभियानांतर्गत राष्ट्रध्वजाचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले. व्याख्यानमालेमध्ये अध्यक्ष म्हणून प्रा. हेमंत वरघने तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चंद्रभान खंगार, डॉ. मुरलीधर रेवतकर उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. विणा काकडे यांनी केले. ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्ताने महाविद्यालयात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. याप्रसंगी डॉ. कसारे, डॉ. विलास पेटकर, प्रा. शिल्पा गणवीर, डॉ. कुमरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.