
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-ट्रान्सफॉर्म डान्स अकॅडमी व माधुर्य ब्युटी पार्लर च्या संयुक्त विधमानाने लिटल राधा कृष्ण फोटो काँटेस्ट च्या कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी उपस्थित राहून लिटल राधाकृष्ण चे कौतुक करीत यापुढे असाच मोठा कार्यक्रम घेण्याचे सांगत आयोजकांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे श्रीहरी बालाजी देवस्थान संचालक निलम राचलवार भाजयुमो शहर अध्यक्ष बंटी वनकर , प्रफुल कावरे , सोनू राचलवार ,तेजस मिसार आदी मंचावर उपस्थित होते,
या ऑन लाईन स्पर्धेत विदर्भातील १५० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. १२ स्पर्ध काना गौरविण्यात आले .यात वेशभूषा वरून प्रथम स्वरा नवघडे सहित इतर विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, संचालन सौ नितु पोहनकर व आभार सौ नम्रता राचलवार यांनी व्यक्त केले. सौ. माधुरी कावरे, कु. बनकर, सौ.मनीषा घाडगे, तेजस मिसार यांनी लिट्टल राधा कृष्ण काँटेस्ट कार्यक्रम आयोजित करून पहिल्यांदाच यशस्वी केला.