
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यातील “रेती साठ्याची” अक्षरश: नियमबाह्य पध्दतीने चोरी होत असल्याने शासकीय कर्मचारी यांची रेती माफियांसोबत जणू हातमिळवणी केल्यागत दिसून येत आहे. असा प्रश्न चिन्ह नागरिकांनी उपस्थित केला आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोर तो चोर आणि वरून शिरजोर असे वाटून खाऊ या संकल्पेतुन रेती तस्करी चा कारभार मोठ्या प्रमाणावर चालला असून लाखो रुपयांच्या या महसुलाचे भागीदार आहेत तरी किती हा संशोधनाचा विषय आहे.
उसेगाव ग्राम पंचायत येथील हद्दीत येत असलेल्या उमा नदी लगत अनेक वर्षांपासून अवैध रेती साठा साठवून ठेवण्यात आला याकडे तलाठी याचे दुर्लक्ष दिसून आले. या रेती साठ्यातील रेतीची वाहतूक उसेगाव येथील उमा नदीच्या पुलाच्या बांधकाम करीता वापरण्यात आली.आणि त्यातल्या त्यात पोकलँड द्वारे उमा नदीतील चोरीची रेती सुद्धा पुलाच्या बांधकाम करीता वापरल्या गेली या ठिकाणी घटनास्थळी केसर खान कळंब आंबा असे नाव लिहिले असलेले गाडगे यांचे ट्रक चिमूर तहसील ला जप्त करण्यात आले.
परंतु या अगोदर तहसीलदार संजय नागतीळक असतांना रेती घाट लिलाव प्रक्रिया राज्य सरकार व पर्यावरण विभाग द्वारा रखडले गेले होते असे असतांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक रेती माफियांनी वेगळी युक्ती लढवून नदीपात्रातील रेतीची रात्रभर पोकलँड व जेसीबी यांच्या सहाय्याने चोरी करून नदी किनाऱ्यावर साठवणूक केली जायची व त्याची तक्रार केली की त्या रेती साठ्याची जप्ती दाखवून त्या साठ्याची लिलाव प्रक्रिया राबवून त्या माफियांनाच साठा विक्री करण्यात यायचा.आज काहीतरी वेगळे बघायला मिळत आहे.
उसेगाव ग्राम पंचायत ने या गावातून जळ वाहतूक करण्यासाठी मनाई केली असल्याचे सांगून जवळच असलेल्या नेरी याठिकाणी रेती साठयाची पुन्हा साठवनुक करायची परवानगी चिमूर तहसीलदार यांचेकडून घेतली असतांना त्या तात्पुरत्या वाहतूक पुरवण्यात वेळेची मर्यादा टाकल्या गेली नाही हे प्रथमतः बघायला मिळाले.व रेतीची वाहतूक करण्याची मुद्दत १८/०८/२०२२ ते २२/०८/२०२२ अशी मर्यादित वाहतूक करण्याची मुभा दिली असतांना दिवस रात्र २४ तास याचा फायदा घेत रेतीची वाहतूक केली जात आहे.यामुळे उसेगाव वासीय स्थानिक नागरिकांची आणि नेरी वासीयांची रात्रीची झोप ट्रॅक्टरच्या कर्कश व ढो – ढो अशा आवाजाने उडाली आहे.
तसेच अनेक ट्रॅक्टर च्या ट्रॉली व मुंडयाला ला नंबर नाही कागद पत्रे नाहीत अशा ट्रॅक्टर च्या सहाय्याने उसेगाव येथील रेती साठ्यातील रेतीची वाहतूक करून नेरी गावातील शिरपूर रोड च्या वळण मार्गावर सर्वे.क्रमांक.७३ हे.आर ८३ याठिकाणी रेतीची साठवणूक करण्याची परवानगी दिली आहे. असे असतांना त्याच ठिकाणावरून हायवा व ट्रॅक्टर द्वारे रेतीची विक्री सुद्धा केली जात आहे ? यावरून असे सिद्ध होते कि पोलीस प्रशासन , महसूल अधिकाऱ्याची हातमिळवणी झाली असावी असे ? नेरी परिसरातील जनतेमध्ये चर्चा असून .याकडे स्वतः जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.