
विशेष प्रतिनिधी
वर्धा:-सावली सा. येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तान्हा पोळ्याचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले, यावर्षी 141 नंदी पोळ्यामध्ये सहभागी झाले.लहान मुलांचा उत्साह वाढावा त्यासाठी पाच बक्षीस ठेवण्यात आले प्रथम बक्षीस निखिल वासुदेवराव सिद यांचा कडून ,द्वितीय बक्षीस नारायणराव पाहुणे यांचा कडून, तृतीय बक्षीस भूषण झाडे व प्रफुल चांभारे यांचा कडून, चतुर्थ बक्षीस सरला अशोकराव गुळघाणे यांचा कडून, पाचवे बक्षीस बाल गणेश मंडळ यांचे कडून देण्यात आले व सर्व मुलाना झाडे लावण्याची कुंडी भेट देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य देवरावजी पाटील, माजी सरपंच विनोदभाऊ तिमांडे, माजी उपसरपंच वसंतराव उघडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री विलासराव गुळघाणे, पद्माकरराव झाडे, सुनील गुळघाणे, हनुमानजी वाघमारे, जगनराव चौधरी, नामदेवराव बोरकर, मुन्नाभाऊ गुळघाणे, वासुदेवराव सिद, उत्तमराव बुरीले, संजय गुळघाणे, व नागरिक उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन सुधीर वाघमारे, भुषण सिद, कुणाल सिद, सचिन बोरकर, भुषण झाडे, सुरज गुळघाणे, प्रफुल बुरले, मयुर वाघमारे, पंकज वाघमारे, प्रफुल चांभारे,हनुमान गुळघाणे, अतुल चांभारे, राहुल कडु, किशोर बोरकर, मंगेश चावके,रोशन गुळघाणे व बाल गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते