
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-नुकतीच शॉओलीन कुंग -फु इंटरनॅशनल ची बेल्ट परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नेरी येथे घेण्यात आली यात २५ ते ३० मुला – मुलींनी सहभाग घेतला होता.
यामध्ये एलो बेल्ट साठी १५ मुलांनी आँरेज बेल्ट साठी ३ ग्रीन बेल्ट साठी १ मरुण बेल्ट साठी २ ब्राऊन बेल्ट १ व ब्ल्याक बेल्ट साठी १ विद्यार्थ्याने भाग घेतला होता. बेल्ट परीक्षेचे आयोजन असिस्टन ग्रॅन्ड मॉस्टर शिफु डॉ. सुशांत के. इन्दोरकर यांनी केले होते परीक्षा घेण्याकरीता ऑल इंडिया चिफ ग्रॅन्ड मॉस्टर शिफु व्ही. सुरेंद्रन केरला व नार्थ इंडिया चिफ शिफु मनोज रुईकर धुळे हे उपस्थित होते.
बेल्ट परीक्षा कार्यक्रमाचे संचालन शिफु विशाल इन्दोरकर यांनी केले प्रमुख पाहुने म्हणुन नेरी च्या सरपंच्या सौ रेखाताई पिसे, उपसरपंच रामचंद्र कामडी, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते हे होते परीक्षक म्हणुन मॉस्टर पिपलायन आष्टणकर, मॉॅस्टर समिक्षा इंदोरकर, मॉस्टर पंकज चौधरी हे होते आभार सौ भावनाताई पिसे यांनी मानले विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडील व मॉस्टरांना दिले.