
प्रतिनिधी – कैलास राखडे
नागभीड – स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे किडा विभागाच्या वतीने हॉकिचे जरदुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमीत्य ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ . जी.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली साजरा करण्यात आला .
कार्यक्रमास अध्यक्षस्थान डॉ . राजेंद्र चव्हाण यांनी भूषविले होते तर प्रा. किशोर बोरकर हे मार्गदर्शक होते तर र्काक्रमास प्रा निलेश गोडे, प्रा. कु. कुसुम चौधरी व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रचल ढोक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. किशोर बोरकर यांनी ” किडा दिनाने महत्व आपल्या जिवनात किती यावर थोडक्यात प्रकाश टाकला त्याच बरोबर क्रिडा विभागादवारे विवीध योजना राबविण्यात येतात त्यांचा लाभ घवुन खेळाडु वृत्तीचा विकास करावा असे सांगितले कार्यक्रमास मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी खेळावर प्रेम करणा-या विद्यार्थ्याची महाविद्यालयाला निरंतर आवश्यकता आहे असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा . चक्रधर भुर्रे यांनी केले तर आभार प्रा. प्रमोद डबले यांनी मानले . प्रस्तुत कार्यक्रमास महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.