
विशेष-प्रतिनिधी
वर्धा:-पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर यांनी शेतकऱ्याचे पीकविमे कर्ज खात्यामधून कपात केले परंतु शेतकऱ्यांनी पुरवसूचना दिऊन सुद्धा आपल्या मनमानी कारभाराने हजारो रुपयाची चोरी शेतकऱ्याच्या खात्यातून केली काही शेतकऱ्यांना सेटलमेंट कराला लावले.
परंतु आता कर्ज देण्यास मॅनेजर टाळाटाळ करत आहे, ज्या लोकांचे सिबिल बरोबर येत नाही अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यापासून मॅनेजरणे वंचित ठेवले अशी तक्रार जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे केली आहे त्यावेळी उपस्थित सावली चे माजी उपसरपंच भुषण झाडे, माजी उपसरपंच सुधीर वाघमारे, सुरज गुळघाणे, सुनील गुळघाणे, प्रवीण चांभारे, राहुल कडू, भूषण सिद, अशोक गुळघाणे, राजू बोरकर, जगनराव चौधरी, राजेंद्र वैतागे, हनुमान सिद, अरुण शंभरकर उपस्थित होते.