Breaking News

मतदार यादी आधार क्रमांक जोडणी सर्व मतदान केंद्रावर 4 व 11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 73 – ब्रम्हपूरी, 74 – चिमूर आणि 75 – वरोरा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर पहिले विशेष शिबिर रविवार दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तर दुसरे विशेष शिबिर रविवार दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिरात नमुना 6 ब अर्ज मतदान केंद्रावर उपलब्ध असेल. सदर शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना आवश्यक ते सहकार्य करावे. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च …

‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 : ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved