Breaking News

पोलीस निरीक्षकास लाच प्रकरणी रंगेहाथ पकडून केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:- पोलीस निरीक्षकाने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून एक लाख रुपयेची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक ५ सप्टेंबर रोजी सोमवारला सापळा रचून श्याम गोविंदराव गव्हाणे या पोलीस निरीक्षकास अटक केली. तक्रारदार मु. नागेपल्ली पोस्ट. आलापल्ली तहसील अहेरी जिल्हा गडचिरोली येथील रहवासी असुन वाहन ट्रान्सपोर्टचे काम करतो असतो.

तक्रार करते यांच्यावर पोऊ स्टेशन अहेरी जिल्हा. गडचिरोली येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्याकरीता व तक्रारदार यांचे वाहन ट्रान्सपोर्टची वाहतुक सुरळीत चालू देण्याकरीता शाम गोविंदराव गव्हाणे, पोलीस निरीक्षक अहेरी यांनी तक्रारदाराकडे १,००,०००/- रुपयांची मागणी केल्याची तक्रारीवरुन आज दिनांक ०५/०९/२०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी व सापळा रचून केलेल्या कार्यवाही दरम्यान शाम गोविंदराव गव्हाणे, पोलीस निरीक्षक अहेरी यांनी तक्रारदाराकडे १,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन पोलीस स्टेशन अहेरी आवारात उभी असलेले शासकिय वाहनामध्ये ठेवण्यास सांगीतले.

त्यावरुन शाम गोविंदराव गव्हाणे, पोलीस निरीक्षक अहेरी यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे.सदरची कार्यवाही राकेश ओला, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. नरेश नन्नावरे, संदेश वाघमारे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे व चा. पो. अं. सतिश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved