
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील अमरपुरी गट ग्रामपंचायत अंतर्गत रोज बुधवार दिनांक 06/09/2022 ला ग्रामपंचायत कार्यालय अमरपुरी येथे ग्रामसभा घेण्यात आली यामध्ये अनेक विषयांवरही ग्रामसभेने मंजुरी दिली,
तसेच महात्मा गांधीतंटामुक्ती गाव समितीचे कार्यकारीणी यावेळी गठित करण्यात आली असून बिनविरोध अध्यक्षपदी पुंडलिक राणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बुधवार दिनांक 06/09/2022 ला घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये विविध विषयांना मंजुरी देऊन , सर्वांचे विशेषता तंटामुक्ती निवड समितिकडे लक्ष वेधले होते.
विषयाच्या अनुषंगाने त्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची कार्यकारिणी सुध्दा गठित करण्यात आली. असून बिनविरोध अध्यक्षपदी पुंडलिक राणे यांची व्यादा सर्वानुमते निवड करण्यात आली त्यावेळी सरपंच , उपसरपंच, आणि ग्राम पंचायत सदस्य तथा रोजगार सेवक तसेच समस्त अमरपुरी येथिल गावकरी उपस्थित होते.