
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-उमाजी राजे नाईक यांना केवळ एका जनसमुहामध्ये मर्यादित करता कामा नये त्यांनी स्वतंत्रची जी मशाल पेटवली तिचे तेज सर्व भारतीय समाजाला स्फूर्ती देणारे आहे इंग्रजाच्या परकीय सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा हा समग्र भारतीय समाजाच्या स्वतंत्रचा लढा होता म्हणून सर्व भारतीयांनी त्यांच्याविषयी कृतज्ञ असायला हवे इंग्रजांच्या विरोधात स्वतंत्रच्या संकल्पनेचे सर्वप्रथम घोषणापत्र उमाजी राजे या महान क्रांतिकारकानी इतक्या सुस्पष्ट स्वरूपात 16 फेब्रुवारी 1831 रोजीच मांडले असे धाडस दुसऱ्या कोणीही केलेले नव्हते,
त्यामुळे स्वतंत्रसाठी इंग्रजांविरुद्ध लढण्याची भारतीयांना पहिली वाट सर्वप्रथम उमाजी राजे नाईक यांनीच निर्माण केली असे प्रतिपादन ड्रॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी आदर्श विद्यालय वडाळा पैकू चिमूर येथे उमाजी राजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष आदर्श विद्यालय येथील मुख्याध्यापक एस के नैताम शिक्षिका के पी बोथले होत्या तर प्रमुख मार्गदर्शक बार्टीच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे प्रमुख अतिथी के पी निखारे आर के खोब्रागडे स्वप्नील वंजारी इत्यादी उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनि उमाजीकडून प्रेरणा तर घ्यायची परंतु त्या प्रेरणेचा आविष्कार अहिंसक आणि बौद्धिक पद्धतीने करायचा हाच मार्ग स्वीकारणे भाग आहे,
उमाजी राजे यांनी तशा प्रकारचा बौद्धिक वारसा दिलेलाही आहे त्यांना लहानपणी लिहायला वाचायला शिकायला मिळाले नव्हते पण वयाच्या तिसाव्या वर्षी ते लिहायला आणि वाचायला शिकले यावरून त्यांनी शिक्षण ज्ञान विद्या यांचे महत्व ओळखले होते या त्यांच्या कृतीतून विद्यार्थ्यांना खुप काही शिकन्यासारखे आहे तेव्हा विद्यार्थ्यांनि उत्तम शिक्षण घ्यायचे बुद्धीचा विकास करायचा धाडसी व्यक्तिमत्त्व निर्माण करयेचे आपले स्वतंत्र जपायचे आधुनिक मूल्यांचा स्वीकार हा आपल्या ध्येयाचा विकास करण्यासाठी करून नव्या जाणिवा घेऊन निर्मितीक्षम आणि रचनात्मक मार्गांनी वाटचाल करत नव्या प्रकाशात जगायचे हीच जीवन शैली अंगीकारन्याची गरज आहे या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एस एस निकुरे यांनी केले.