
विशेष प्रतिनिधी
वर्धा:-सावली येथील शेतकऱ्यांना रामदासजी तडस यांची भेट घेतली व त्यांना पंजाब बँकेमध्ये शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, शेतकऱ्यांनी पीकविम्याचे पैसे कपात करु नये याकरिता पुर्वसूचना व निवेदन दिले असून सुद्धा पैसे कपात केले व सेटलमेंट करायला लावले परंतु आता कृषी कर्ज देत नाही आम्हाला आदेश नाही असे सांगतात.
ज्या शेतकऱ्याचे सिबिल कमी आहे अशा शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्यापासून वंचित ठेवले.बाहेरगावरून आलेल्या लोकांना सुद्धा 1 च्या नंतर एन्ट्री करून देत नाही वयोवृद्ध लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. खासदार रामदासजी तडस यांनी तात्काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी द्वारे संपर्क केला व सांगितले की पंजाब बँके विरोधात भरपूर तक्रारी शेतकऱ्याचा प्राप्त झाल्या आहे,
आणि शेतकऱ्याचा व्यथा सांगितल्या त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जिल्हाधिकारी यांना आदेश दिऊन शेतकऱ्याचे प्रकरण मार्गी लावू व काही दिवसामध्ये वर्धा जिल्हा दौरा नियोजित आहे त्यामध्ये आपण थेट पंजाब बँक तरोडा येथे जाऊन विचारणा करू शेतकऱ्यावर अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना त्रास देणे हे योग्य नाही अशा कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करू असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आता उपमुख्यमंत्री कोणती कार्यवाही करणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे, यावेळी उपस्थित माजी उपसरपंच भुषण झाडे,किसना गुळघाणे,सुधीर वाघमारे, सुरज गुळघाणे, प्रवीण चांभारे, राहुल चांभारे, हनुमान सिद, राजू बोरकर, अतुल चांभारे,विकेश कांबळे उपस्थित होते.