
चिमूर शहर काँग्रेसचा पहिला उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दिनांक 16 सप्टेंबर 2022 शुक्रवारला चिमुर येथे चिमुर विधानसभेचे समनव्यक तथा माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर यांचे वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेस कमिटी चिमूरचा वतीने आपले प्रत्येक आंगवाडीत जाऊन मुलांना बास्केट वाटप कार्यक्रम करण्यात आले. व हा बास्केट वाटप कार्यक्रम शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी स्वतः स्वनिधीतून सकाळी 11 वाजता पासुन सुरू करुन देले व नंतर 12 वाजता तालुका काँग्रेस कार्यालय चिमूर येथे नामदेराव किरसान यांच्या उपस्थित डॉ. सतीशभाऊ वारजुकर यांना शाल श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन शहर काँग्रेस कमिटीचे वतीने शुभेच्छा देन्यात आले यावेळी शहर अध्यक्ष अविनाश अगडे , तालुका पर्यावरन अध्यक्ष प्रदीप तळवेकर ,उपाध्यक्ष अमोल जुनघरे,मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख, घनश्याम रामटेके , नितिन कटारे, दिपक कुंभारे,गोलू पजोने, माजी नगसेवक कदिर चाचा , विनोद ढाकुनकर , युवक काँग्रेस जिल्हा महासचिव गौतम पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे, तालुका प्रभारी अक्षय लांजेवार, शहर प्रभारी अक्षय नागरिकर व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते, यातील प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने,आर्थिक, शारीरिक ,मदत करून शहर काँग्रेस कामेटी ला साहाय्य केल्या बद्दल शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी सर्वांचे आभार मानले.