
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-वरोरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत पारडी(गिरोला ) येथे पंतप्रधान आवास योजना(ड) च्या घरकुल यादीत,जनावरच्या गोठाच्या यादीत, स्मशानभूमी शेड ची जागा स्थलांतरित केल्याबद्दल,पाणी पट्टी कर बद्दल घोटाळा, कोणालाही न विचारता ठराव पास करणे, महिला सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांची दिशाभूल करुन स्वतःच्या मनमानी ने ग्रामसेवक व संगणक परिचलक कारभार करत असल्याने पारडी ग्रामवासियांनी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या सहकार्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांना निवेदन देऊन दोन दिवसात चौकशी करुन,
ग्रामसेवक व संगणक परिचालक यांच्यावर योग्य कार्यवाही करावी अशीमागणी पारडी ग्रामवासियांनी केली.
त्यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस मनिषभाऊ जेठानी,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड, जेष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरेसर, माजी नगरसेवक दिनेशभाऊ यादव,ग्रामपंचायत सदस्य पंडितभाऊ आत्राम व समस्त पारडी येथील ग्रामवासी उपस्थित होते.