
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-आदिवासी विकास विभाग द्वारा संचालित आदिवासी मुलींचे वसतिगृह वरोरा येथे विद्यार्थीना भोजनाची व्यवस्था बाहेरून केली जाते.
त्यामुळे मुलींना आर्थिक टंचाई चा सामना करावा लागतो.
तरी वसतिगृहातील मुलींना भोजनाची व्यवस्था करुन चांगले भोजन दयावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली,
युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर मनिषभाऊ जेठानी यांनी केली.
त्यावेळी उपस्थित शिवसेना माजी नगरसेवक दिनेशभाऊ यादव, जेष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरे सर व शिवसैनिक ओमकार लोडे उपस्थित होते.
मुलींना चांगले भोजन उपस्थित नाही केले तर युवासेनेच्या वतीने वसतिगृहातील मुलींसाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना जिल्हाचिटणीस मनिषभाऊ जेठानी यांनी दिला.