
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 27 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या अंतर्गत ब्रह्मपुरी येथील मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे लक्ष्मण मेश्राम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. राजुरा येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे संगणक अभियंता ज्ञानेश सोनवणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे चेतन रामटेके, बल्लारपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे चेतन वानखेडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच वसतीगृहात मिळणाऱ्या सोयीसुविधेचा योग्य वापर करण्यात बाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी कशी करावी, वेळेचे नियोजन कसे करावे आदींबाबत विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली.