Breaking News

दोन रेती व्यावसायिक यांनी दिली पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी

चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक संदर्भात सोशल मीडियावर थोडक्यात मजकूर व रेतीचे फोटो पोस्ट केल्याने दोन रेती व्यावसायिकांनी पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने रेती व्यावसायिक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे,

दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास चिमूर शहरातील जुना बस स्टॉप येथे रेती व्यवसायिक भूषण सातपुते व गोलू भरडकर यांनी पांढऱ्या रंगाच्या सिवफ्ट गाडीने येऊन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पत्रकार विलास मोहिंनकर यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved