
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चंद्रपुर येथील बंगाली कॅम्प परिसरामध्ये राहणारा आरोपी सुजन जिर्तेन मालो वय 30 वर्षीय हा 7 ऑक्टोबर ला जुनी बजाज मोटर सायकल क्रमांक MH-33 E – 978 असलेल्या वाहनाने अवैधरित्या गांजा सोबत घेऊन दूध डेअरी मार्गाने जाणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती, मिळालेल्या माहितीच्या आधारे डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी दूध डेअरी मार्गावर नाकाबंदी करून त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या वाहनात एक थैली आढळून आली.
त्या थैलीमध्ये 2 किलो 300 ग्राम गांजा वनस्पती मिळून आली. सदर मालाची किंमत 20 हजार 300 रुपये असल्याची माहिती प्राप्त झाली, मागील एक वर्षांपासुन आरोपी सुजन हा चंद्रपुर मध्ये राहत नव्हता तो गडचिरोली जिल्ह्यात गेला होता. अचानक वर्षभरानंतर तो चंद्रपूर जिल्ह्यात गांजा घेऊन दाखल झाला होता, गांजाचे सॅम्पल दाखविण्यासाठी सुजन चंद्रपुरमध्ये आला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी नागरिकांना विनंतीपूर्व आवाहन केले की शहरात कुठेही अंमली पदार्थ विक्री, खरेदी होत असेल तर पोलिसांना याबाबत माहिती द्या, आम्ही अंमली पदार्थविरोधात अभियान राबवून ही घाण साफ करू. सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, सतीश अवथरे, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता यांनी यशस्वीपणे पार पाडली पुढील तपास पोलीस करत आहे.