Breaking News

फ्री वाय फाय म्हणजे काहीवेळा धोक्यात पाय – (फसवणुकीचा लेटेस्ट प्रकार)

सायबर तज्ञ नामांकित वकील चैतन्य भंडारी, धुळे यांचे मनोगत/सर्वमान्य जनतेसाठी सावधानतेचा ईशारा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५

मुंबई:-पूर्वी फक्त अधिकृत अशा विमानतळावर अथवा सरकारी कार्यालयात फ्री वाय फाय सुविधा असायची, मात्र लोकांची गरज ओळखून व आपल्या सेवेशी / बिजिनेसशी लोकांनी कनेक्ट राहावे म्हणून आता अनेक ठिकाणी “फ्री वाय फाय” ची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

अगदी कॉफी शॉप पासून फूड कोर्ट, मॉल, मोठे रेस्टॉरंट खाजगी बस स्थानक (वोल्वो) इत्यादी ठिकाणी ठळकपणे हल्ली “फ्री वाय फाय” चे बोर्ड लागलेले दिसतात. आणि बहुसंख्य ठिकाणी तिथेच जवळ त्याचा पासवर्ड पण दिलेला असता.
फ्री वाय फाय सुविधा बहुतेक अशाच ठिकाणी पाहायला मिळते जिथे बऱ्यापैकी वेळ लोकांच्या हातात असतो. त्यामुळे ते निवांत असतात. आणि माणसे निवांत असली की थोडी निष्काळजी असतात असं मानसशास्त्र सांगत.

नेमका याचाच फायदा घेऊन आता हॅकर मंडळींनी या “फ्री वाय फाय” मध्ये प्रवेश केला आहे.

तर त्याबद्दल आज थोडक्यात सांगून त्याचे उपायही सांगतोय.

फसवणुकीची पद्धत :

तुम्ही अशा फ्री वाय फाय ठिकाणी बसून तिथला ऍक्सेस घेऊन तुमचे नेट सुरु करता. सर्फिंग / सर्चिंग / चॅटिंग सुरु करता. मात्र जिथून हा ऍक्सेस घेतला आहे त्या उपकरणात एक प्रकारची चिप ऑलरेडी बसवलेली असते. ज्याच्या मार्फत व्हायरस (हॅकिंग) ची लिंक तुमच्या मोबाईलमध्ये घुसवली जाते. आणि त्यातून मग तुमच्या मोबाईल मधील फोटो / डेटा / इतर बँकिंग डिटेल्स वगैरे हॅक केले जातात.

त्यांनतर मग फोटो मॉर्फ वगैरे करून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून लुटले जाते किंवा मग बँकिंग व इतर डेटा माध्यमातून फायनॅन्शियली लुटलं जाते. कारण तुमच्या फोनमध्ये त्या व्हायरस मधून जणू काही असं सेटिंग ऍटोमॅटिक होते की मग जणू तुमच्या फोनचा चक्क क्लोन (डुप्लिकेट) त्या हॅकर कडे तयार होऊ शकतो. (जे कॉम्पुटर वापरतात त्यांना कळेल…. टीम व्ह्यूवर किंवा एनी डेस्क हे अँप जसे काम करते अगदी तसेच हे फ्री वाय फाय मधील व्हायरस काम करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये काय काय करताय तेही सहजपणे त्या हॅकरला समजू शकते.

म्हणजे पहा किती धोकादायक स्थितीत तुमचा फोन (म्हणजेच तुम्ही स्वतः) अडकता. उदा. गुगल पे जरी करत असाल तर तुम्हाला वाटत की कुणाला न दिसेल अशा अँगल ने मी पिन / पासवर्ड टाकतोय. पण बाबांनो ते सगळं स्क्रीन शेयर मुळे त्या हॅकर ला बसल्याजागी दिसतेय. त्यामुळे तुमचा पिन / पासवर्ड त्याला कळतो. त्यापुढं कहर हा की, तुम्ही एखाद्याला पेमेंट केले की नंतर तुमच्या बँकेचा मेसेज येतो. आणि त्यात सगळं ट्रँजॅक्शन तुम्हाला सांगून शेवटी एक ओळ येते की आता अमुक इतका बॅलन्स तुमच्या खात्यात आहे. (हेही त्या हॅकर ला दिसत) आणि मग दोन पाच सेकंदात तुमचं अकाउंट पार साफ धुतलं जात ! आणि तुम्हाला प्रश्न पडतो… पैसे गेले कसे ?
कळलं ? आता यावर उपाय काय मग ?

धोक्यातून सावरायचा उपाय :

सोप्पं आहे. शक्यतो अशा फ्री वाय फाय च्या मोहात पडूच नका. त्यामुळे मग ना रहेगा बास न बजेगी बासुरी. तसेही आजकाल सर्वांच्या मोबाईल मध्ये स्वतःचा डेटा पॅक असतोच की. तो वापरा. फुकटचे वायफाय वापरून दोन पैसे वाचवल्याच्या आनंदात सगळंच धुतलं जाईल तुम्हाला…. हे विसरू नका. असं म्हणतात की विमानतळ वगैरे अधिकृत ठिकाणी सर्व सुरक्षित असत. मान्य आहे. पण लोकांचा काय भरोसा ? तिथंही कुणीतरी स्वार्थीपणाने चार पैसे जास्त मिळावेत म्हणून असं काही करणार नाही कशावरून ? एकदा कळलंय की ते विष आहे तर त्याची परीक्षा घ्यायला का जायचं न ?

तेव्हा तो मोह टाळा… सुरक्षित राहा !

डीडी क्लास : एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या जगात “मोफत” असं काहीही नसत. तुम्हाला ते फक्त भासवलं जात. पण इतर मार्गाने ते लोक त्यांचा फायदा करून घेत असतात. हे विसरू नका. त्यामुळे “फुकट ते पौष्टिक” हि आपली मानसिकता बदला. नाहीतर कधीतरी असे अडकाल मग रडत बसाल ! त्यापेक्षा “फ्री” चा मोह सोडणे कधीही चांगले न !

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved