
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-कोवीड-१९ काळात जनसामान्यांचे मोडलेले आर्थिक कंबरडे, तसेच वाढलेली महागाई यामुळे जीवन कठीण झालेले असतांना सामान्य जनतेस आरोग्य खर्च सुध्दा झेपेनासे झालेले आहे. खुप रक्त चाचण्या व त्यास लागणारी रक्कम, तसेच इतर अनेक चाचण्यांचा खर्च हा अवाढव्य असतो. उपचारासाठी जाण्याआधीच सामान्य जनता या चाचण्यांच्या खर्चाबाबत खचलेल्या मनस्थितीत असतात. अशा परिस्थितीत काही स्वयंसेवी संस्था तथा डॉक्टर सवलती दरात उपचार उपलब्ध करून देऊन जनसेवा करीत असतात.
अशीच एक संस्था ‘इनार्च फाउंडेशन’ चिमूर क्रांतीभूमीत लोकांच्या मदतीला धावून आलेली आहे. इनार्च फाउंडेशन चे डॉ सुशांत घनशामजी पिसे यांच्या पुढाकारातून इनार्च फाउंडेशन व इनार्च मल्टिस्पेशालिस्ट क्लिनिक यांच्या संयुक्त उपक्रमातून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करने तसेच कमीत कमी सवलती दरात योग्य रोग विशेषज्ञांकडुन रुग्नांना उत्तम आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी कटीबद्धता दर्शविली आहे.
चिमूर, जि.चंद्रपूर या ग्रामिण भागात इनार्च मल्टिस्पेशालिटी क्लिनिक स्थापन केल्यामुळे जनतेला उत्तमोत्तम आरोग्य सेवा मिळणारच आहे. सोबत उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्याचा व तिथे लागणारा अवाढव्य खर्च यातही कमालीची बचत होणार आहे. सामान्यपणे लागणारा चाचण्यांचा खर्च हा जवळ जवळ निम्म्या सवलती दरात करून देण्यात येईल असा संस्थेचा कयास आहे.
येणाऱ्या १६ ऑक्टो. २०२२ रोज रविवारला स. १० ते सा. ४ वाजेपर्यंत इनार्च मल्टीस्पेशालिस्ट क्लिनिक आदर्श कॉलनी (टीचर कॉलनी ) वडाळा पैकु, न्यु बस स्टॉप जवळ, चिमूर येथे हेल्थ चेकउप शिबिराचे आयोजन केले आहे ,फक्त रु. ५० ची फि आकारून रजिस्ट्रेशन करून रुग्नांना शुगर, हिमोग्लोबीन, डॉक्टर विवेक कुहीटे हृदय रोग व शुगर विशेषज्ञ नागपुर डॉ जमील अहमद प्रसिद्ध सर्जन नागपुर चेकअप व मार्गदर्शन करणार आहे.
तसेच दि. २१ ऑक्टो. २०२२ रोज शुक्रवार ला याच क्किनीक मध्ये तज्ञ डॉक्टर चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेल्या एकमेव हाडांची चाचणी करणाऱ्या मशीनद्वारे तपासनी करून दिली जाणार आहे. सामान्यता संपूर्ण शरिरातील हांडांची तपासणी या मशिनव्दारे केल्यास लागणारा खर्च हा रुपये २००० इतका आहे. परंतु संस्थेचा सेवाभावी उद्देश्य समोर ठेवत क्लिनिक मध्ये ही तपासनी रुपये १०० इतक्या नाममात्र रकमेत करून देण्यात येत आहे.
दि २१ ऑक्टो.२२ शुक्रवार ला असाध्य आजरांवर होमियोपैथी चिकित्सा द्वारे चिकित्सा करण्यात येणार आहे,
तरी या संधीचा फायदा घेत जनसामान्यांनी स्वतःची व स्वतःच्या प्रियजनांची तपासनी करून व मार्गदर्शन घेऊन आरोग्य बळकट करावे असे आवाहन संस्थेचे डॉ. सुशांत पिसे यांनी केले आहे अधिक माहिती तथा नोंदणी साठी ९३०९२९२४०५ ,७७२००३६५८८ही भ्रमणध्वनी क्रमांक दिलेली आहेत.