
दिवाळी स्नेहमीलन सोहळा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-माझ्या पाठीशी आई बहिणी सातत्याने राहत असल्याने दुसऱ्यांदा आमदार झालो असून कोरोना काळात समाजाची खरी सेवा आरोग्य विभागाने केले असल्याने आरोग्य सेविका खऱ्या चोवीस कॅरेट सोनं असल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आशा वर्कर यांना कपाट देण्याची ग्वाही दिली.अंगणवाडी, मदतनीस, परिचारिका, आशा वर्कर यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. आमचे सरकार १०० रुपयात तेल, डाळ, रवा, साखर चार वस्तू स्वस्त धान्य दुकानातून मिळणार असल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी शुभेच्छा दिल्या.
अंगणवाडी सेविका,मदतनीस व परिचारिका ,आशा वर्कर यांचा स्नेह मिलन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी आमदार बंटीभाऊ भांगडिया तर प्रमुख पाहुणे वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, दिगंबरराव खलोरे, शहर अध्यक्ष सचिन फरकाडे,माजी सभापती विनोद चोखरे ,जयंत गौरकर ,शरद गिरडे , प्रवीण गणोरकर ,सौ रत्नमालाताई मेश्राम आदी उपस्थित होते.
प्रास्तविक भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मायाताई ननावरे तर संचालन सौ भारती गोडे यांनी केले. तालुक्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर, परिचारिका उपस्थित होत्या.भाजप, भाजयुमो ,महिला आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.