
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-तालुक्यातील सात बहिणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नवतळा येथील जंगल शेजारी बेलदेव मंदीर असून दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जात असते,परंतु रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने यात्रेकरूंना त्रास सहन करावा लागत आहे, माजी सरपंच महादेव कोकोडे यांनी ही समस्या आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कडे सांगितली.
तेव्हा तात्काळ आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी स्व खर्च निधीतून जेसीपी पाठवून रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे, आमदार भांगडिया यांनी जेसीपी पाठवून रस्ता दुरुस्ती करून दिल्याबद्दल महादेव कोकोडे, श्यामजी लांजेवार, राजु जंगीटवार, सुधाकर खेडकर, रामचंद्र रुईकर विजय डायरे, लक्ष्मण सुरनकर, दीपक कुमरे आदी गावकऱ्यांनी आभार व्यक्त करीत अभिनंदन केले.