Breaking News

पोलीस स्टेशन चिमूर येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-इनार्च फाउंडेशन तथा इनार्च मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि डायगणोस्टिक सेंटर चिमूर यांच्याद्वारे ‘आपले आरोग्य आपल्या हाती अभियान’ अंतर्गत चिमूर येथे हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड तसेच इतर अनेक प्रकारच्या आरोग्य तपासणीचे शिबीर दि. ०६/११/२०२२ रोज रविवार ला आयोजित केले होते. या अभियाना अंतर्गत सकाळी १० वाजता पासून ते दुपारी ०२ वाजता पर्यंत इनार्च मल्टीस्पेशालिटी क्लिनिक न्यू आदर्श कॉलनी ( टीचर कॉलनी) वडाळा पैकु येथे तपासणी शिबीर राबविण्यात आले.

त्यानंतर दुपारून सदर शिबीर पोलीस स्टेशन चिमूर येथे राबविण्यात आला. पोलीस स्टेशन चिमूर येथील सर्व पोलीस बांधवानी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वताची आरोग्य तपासणी करून घेतली. इनार्च फाउंडेशन चे आयोजक डॉ. विवेक कुहिटे, डॉ सुशांत पिसे यांनी सायंकाळ पर्यंत क्लिनिक आणि नंतर पोलीस स्टेशन येथे मोफत आरोग्य तपासणीची सेवा दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved