
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नाव – कृष्णा खरात
वय – 16 वर्ष
गाव – सिद्धेश्वर पिंपळगाव
तालुका घनसावंगी, जिल्हा जालना
जालना: तिर्थपुरी येथे झालेल्या समाजभान दशकपूर्ती सोहळ्यामध्ये कृष्णा खरात या मुलाचे वडील आपल्या मुलाची शस्त्रक्रिया मोफत करावी म्हणून भेटीस आले होते.
त्याच्या डाव्या हाताचे दोन्ही हाड तुटलेले होते. त्याचे ऑपरेशन कुठल्या योजनेतही होत नव्हते. हाड मोडल्यामुळे मुलाला खूप वेदना होत होत्या. मेळाव्यासाठी आलेले समाजभानचे स्वयंसेवक आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाड्याचे डॉक्टर सेलचे डॉक्टर उमेश जाधव यांना संबंधित मुलाची माहिती देताच त्यांनी तात्काळ दीपक हॉस्पिटल मध्ये त्याला बोलावून घेतले. त्याच्या सर्व तपासण्याही मोफत केल्या. तसेच ज्या शस्त्रक्रियेसाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च होता ती शस्त्रक्रिया त्यांनी मोफत केली. शस्त्रक्रिया झाल्यामुळे आज त्याला वेदनेतून मुक्ती मिळाली आणि आज त्याच्या आणि त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर डॉ उमेश जाधव यांच्यामुळे आनंद दिसू लागला.
आपल्या मुलावर झालेल्या या मोफत शस्रक्रियेसाठी खरात कुटूंबियांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री सहायता कक्षचे मंगेशजी चिवटे यांचेही आभार मानले.
तर या मुलावर उपचार करण्यासाठी मराठवाडा कक्षप्रमुख दादासाहेब थेटे, सोशल मीडिया प्रमुख आकाश चापकानडे आणि दीपक हॉस्पिटलच्या सर्व मेडीकल स्टाफचे आभार मानले.
“डॉ उमेश जाधव यांच्यासारखा देव माणूस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मदतीला धावून येवो…” असा आशीर्वाद या मुलांच्या आईने डॉक्टरांना दिला.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे.