
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील घरकुल मंजूर होऊन आज ५ ते ६ महिने होत आहे तरी लाभार्थी घरकुला पासून वंचित आहेत,नागरपरिषद मध्ये तोंडी चौकशी केली असता सांगण्यात आले की घटकूल निधी उपलब्ध नाही. तर मग करकुल वाटपाचे पत्र का वाटप करण्यात आले हा एक प्रश्नच आहे.
असा तर चिमूर नागरपरिषदेला करडोचा निधी येताना दिसतो तर घरकुल निधी का नाही येत नाही हा एक पडलेला प्रश्नच आहे . श्रीमतांना जगवा आणि गरिबाला लॉलीपॉप द्या अस सरकारच धोरण दिसते . लोकप्रतिनिधींनी या कडे लक्ष घालून लवकरात लवकर घरकुल साठी निधी उपलब्ध करून घ्यावा अशी आमची मागणी आहे . तसेच नागरपरिषदेनि पण या कडे गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा नाही तर आम्ही सतीशभाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वात नागरपरिषदेला घेराव घालू व चिमूर शहर काँग्रेस कडून धरणे आंदोलन करू.