
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.१०/११/२०२२ ला जांभुळघाट येथे जुनी परीवार तफ्रे दर वर्षी प्रमाणे यंदा हि गुरु नानक देव जी चा ५५३ वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी गुरु नानक देव जी यांच्या शिक्षेविषयी माहिती दिली जाते.
गुरू ग्रंथ साहिब पाठ केल्या जात असते.तसेच शिख पंथाचे प्रथम गुरू नानक देव जी असल्याने आज च्या दिवशी सर्वत्र गुरू प्रकाश पर्व (जयंती) मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येत असते. दरवर्षी प्रमाणे आज ही या जयंती निमित्त जांभुळघाट येथील समूह सात संगत एकत्रीत येत असते.यावेळे सुखमिनी चा पाठ केला जातो नंतर अरदास व गुरूनान देव जी यांच्या शिक्षेविषयी,देव रूपी माहीती दिली जाते.
या विषयी मोजक्या वेळेत पाट्टी स.गुरुदेवसिंग दुधानी ,(गडचिरोली)स.जिवनसिंग जुनी(कांडली),स.रतनसिंग अंध्रेले (वाहनगाव),हट्टीलासिंग डांगी (ठानेगाव) व स.प्रगटसिंग (धापेवाडा) यांनी मोलाची माहीती दिली.काही व्यक्तीचे सत्कार करण्यात आले. व या नंतर कार्यक्रमाचे आभार स.अदबसिंग जुनी यांनी केला.त्या नंतर लंगर ( महाप्रसाद ) चा कायकर्म घेण्यात आला. स्थानिक वासिय यावेळी एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.