
काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांची मांगणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगर परिषदेच्या अंतर्गत येत असलेले प्रत्येक वॉर्डांत कचरा गाडी येतो आणि कचरा नेत असतो आणि त्यास कचरा गाडीने एक दररोज मुणादी देत आहे. घरातील ओला कचरा व ( घातक) कचरा , आणि सुका कचरा वेगळा, वेगळा ठेवावे आणि नगर परिषदेची कचरा गाडी येते त्यात वेगवेगळा टाकण्यात यावे आणि नगर परिषदेनी एक मोहीम सुरू केली आहे. दि. ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जो कोणी या स्पर्धेत भाग घेईल त्याला बक्षीस वितरण करण्यात येइल त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रतेक घरोघरी, दुकानात नगर परिषदेने क्यू आर लावले आहे.
त्या कोड ला स्कॅन करून एक नगर परिषदेचे व्हॉट्सप नंबर दिले आहे. त्या नंबरवर फोटो कडून पाठवा असी मुनादी नगर परिषदेची कचरा गाडी देत आहे. परंतु जनतेनी अलग , अलग कसे ठेवायचे या करीता नगर परिषदेने प्रत्येक घरी आणि प्रत्येक दुकानात दोन कलर चे दोन कचरा डब्बे वाटप करण्यात यावे . जेणकरून ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा जमा करता येईल व शहरात स्वच्छता सुध्दा राहतील जर कचरा डब्बे देत नसेल तर अशी मुणादी देणा बंद करावे व तसेच काही ठिकाणी नेहमी कचरा जमा राहते असे जागी तो कचरा तिथे टाकणा बंद कसा होईल याकडे लक्ष द्यावे मागणी काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले आहे.