
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे: सध्या प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन होत आहे, खासकरुन तरुण पिढी ही मोबाईल फोन मध्ये चोवीस तास व्यस्त असते. पुर्वीच्या काळात आई-वडील, घरातील ज्येष्ठ नातेवाईक मंडळी हे आपल्या मुलांसाठी स्थळ शोधायचे तसेच त्याबाबत खात्री करुनच, त्याच्याशी संबंधित परिवाराची योग्य ती शहानिशा करुन शोधलेले स्थळ पसंत वा नापसंत केले जायचे. परंतु आजकालच्या डिजिटल युगाच्या काळात मुले व मुली हे स्वतः डेटींग वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या स्वतः साठी ऑनलाईन स्थळ शोधतात व आपला होकार दर्शवितात. परंतु हया ऑनलाईन पार्टनरची खात्री न करता, योग्य ती चौकशी न करता आपली खाजगी माहिती, पर्सनल फोटोज्, बँकींग डिटेल्स त्या संबंधित व्यक्ती सोबत शेअर करतात व त्याच्याशी बोलण्यास सुरुवात करतात व डेटवर जातात, याचाच गैरफायदा काही व्यक्ती घेतात त्यानंतर मग गंभीर गुन्हे घडण्यास सुरुवात होते व याअगोदर देखील अशा काही घटना घडलेल्या आहेत, म्हणून हे डेटींग अॅप जरुर वापरा, पण ते अॅप वापरतांना सावध रहा, सतर्क रहा, त्याबाबत पुरेशी सावधगिरी बाळगा, समोरच्या व्यक्तीला आपली खाजगी माहिती, पर्सनल फोटोज् शेअर करण्याअगोदर विचार करा व त्या व्यक्तीला भेटण्याअगोदर आपल्या आई-वडिलांशी चर्चा करा व आई वडिलांना ऑनलाईन पार्टनरची संपुर्ण माहिती द्या, त्यानंतरच तुमचा अंतिम निर्णय ठरवा असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.