
विशेष प्रतिनिधी
वर्धा:-पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 तरोडा अंतर्गत तरोडा, सावली, मदनी ,साखरा या गावांमध्ये लंबी या चर्म रोगाच्या लसीकरण कार्याला सुरुवात झालेली आहे. ही लस मोफत आहे .कोणत्याही प्रकारचा सेवा शुल्क घेतल्या जात नाही हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे सुरू झालेले आहे .सन 2020 या रोगाचे बरेच रुग्ण होते परंतु सध्या तरी या रोगाचे रुग्ण या परिसरात आढळलेले नाही तरी पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.
मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारचा सेवाशुल्क न घेता त्या रुग्णावर उपचार करण्यात येईल असे आव्हान पशुवैद्यकीय दवाखाना तरोडा चे संस्थाप्रमुख डॉ. प्रदीप थूल यांनी केलेले आहे.
डॉ.थूल दिवस रात्र मेहनत करून सेवा देण्याचे कार्य अविरत करत आहे, आज सावली या गावांमध्ये 100 गाय व बैलांना लंपी स्किन डिसीज या रोगाचे लसीकरण घरोघरी जाऊन केलेले आहे या लसीकरण कार्याला सुरज गुळघाने, लक्ष्मण तिमांडे,कृष्णा गुळघाने ( दुग्ध व्यवसायिक) प्रवीण चांभारे, यांनी मोलाचे सहकार्य केले.