
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, गडचिरोली द्वारे राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात चिमूर तालुक्यात विविध उपक्रमांनी संविधान जागृती केल्याबद्दल नेचर फाउंडेशन, नागपूर ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
भारतीय मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेल्या भारतीय संविधानाची अंबलजावणी होऊन ७२ वर्षे लोटली.पण अद्यापही भारतीय समाजात ते रुजले नाही,जनमानसात ते पोहचविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मागील वर्षी नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र व गुजरात राज्यात संविधान जागराचा म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले होते या मध्ये संविधान जागृती ,अंधश्रद्धा निर्मूलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबद्दल मार्गदर्शन, वसतिगृह प्रवेश माहिती,ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका असे विविध उपक्रम राबविण्यात आले याची दखल घेत या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
पुरस्कार प्रदान सोहळ्यात देवेंद्र रायपुरे,नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अमित पुंडे,नरेन गेडाम,डा. के.प्रेमकुमार यांचे हस्ते नेचर फाउंडेशन चे सचिव निलेश नन्नावरे, सदस्य अमोल कावरे,आशिष जीवतोडे यांना प्रदान करण्यात आला.