
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-अत्पलवर्ना कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी द्वारा आयोजित तथा सुश आसरा फाउंडेशन इंडिया द्वारा प्रायोजित ‘नॅशलन कुंग फु अँड कराटे ओपन चॅम्पियनशीप- 2022’ ही येत्या 04 डिसेंम्बर 2022 रोज रविवारला चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृह पिंपळनेरी रोड येथे होणार आहे. कुंग फु चे ग्रँड मास्टर शिफु डॉ. सुशांत इंदोरकर तथा शुश आसरा फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. पायल कापसे यांनी चिमूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्व कळावे, त्याचे भविष्यातील फायदे व वयक्तिक जीवनात उपयोग कळावे, तसेच आपल्या परिसरात क्रीडा व कराटे मध्ये रुची वाढावी करिता या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
चिमूर येथे पहिल्यांदाच होणाऱ्या या नॅशलन कुंग फु व कराटे स्पर्धेत देशातील मार्शल आर्ट खेळाडूंनी सहभागी व्हावे म्हणून स्पर्धा आयोजकांनी सर्व कुंग फु मास्टर्स तथा कराटे प्रशिक्षकांना याद्वारे आमंत्रित करीत आहेत की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेऊन लाभ मिळवून द्यावा.
या नॅशलन स्तरिय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू विशाखापट्टणम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसही पात्र ठरणार आहेत. चिमूर वासीयांस सुद्धा ही स्पर्धा बघून आत्मरक्षण धडे घेण्यास प्रेरित होण्याची संधी मिळत असल्यामुळे सर्व जनतेस ही स्पर्धा बघायला येण्यास आमंत्रित करण्यात येत आहे.