Breaking News

राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधिर विद्यालय येथे दिव्यांग दिन साजरा

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनातून खचून जाऊ नये, मुलांना साथ दया असे आवाहन पालकांना – तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी दिव्यांग दिनी केले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दिव्यांग मुले सामान्य मुलापेक्षा गुणांनी कमी नसतात, त्यांना साथ दया, त्यांचा आत्मिश्वास वाढवायला हवा. अनेक दिव्यांग व्यक्तींनी गरुडझेप घेतली आहे. या विशेष बालकांत विशेष नैपुण्य असते ते समोर आणण्याचे काम आपल्याला करायचे असते.माझ्या वतीने तहसीलदार म्हणून मला या मुलांसाठी जेवढं करता येईल तेवढे सहकार्य करणार असे प्रतिपादन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी मुक बधीर विद्यालय येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय दिव्यांग दिन व क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक हजारे होते.कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्नपुरवठा निरीक्षक अधिकारी आशिष फुलके, शिक्षक भारती संघटनेचे विभागीय सचिव सुरेश डांगे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्रीहरी सातपुते, मुख्याध्यापक रामदास कामडी पालक मंगेश तुळसकर, राजेंद्र बावणे उपस्थित होते.

प्रमुख अतिथी सुरेश डांगे, श्रीहरी सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालय तर्फे आयोजित राष्ट्रीय दिव्यांग दिन व क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून व महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आले.यावेळी मुक बधीर विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर करून उपस्थित पालकांचे लक्ष वेधून घेतले होते. क्रीडा क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते सन्माचिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन कल्पना महाकाळकर यांनी केले व प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मदास पानसे, भूपेंद्र गरमडे, उद्धव खोब्रागडे, ताराचंद बोरकुटे, अशोक विभुते, पटवारी कोहपरे, राजू बनसोड, दिलीप ऊरकूडे, दिलीप चौधरी, श्रुती मुन, चंद्रभागा वांढरे विद्यालयच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved