
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर येथे दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी मंगलवार ला तालुका काँग्रेस कार्यलय चिमुर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धनराज मालके शहर संपर्क प्रमुख यांच्या उपस्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करीत मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका काँग्रेस पर्यावरण अध्यक्ष प्रदीप तळवेकर, मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख, तालुका उपाध्यक्ष राजु चौधरी, सुधिर पांदीलवार , योगेश थुठे , नागेंद्र चट्टे , अक्षय लांजेवार, शहेणाज अंसारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.