
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
बीड- परळी वैजनाथ: मी आनिल आंबादास जायभाये (बीडकर) रा. सोमेश्वर नगर, शिक्षण – 12वी, MPW, GNM, PBSC NURSING, आपणा सर्वांनाच (मतदारांना) कळकळीची विनंती, आग्रह, आवाहन करतो की परळी वैजनाथ शहरातील सर्व साधारण जनता तसेच शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कंञाटी नर्सेस, वार्ड बॉय, ऑपरेटर, सफाई कर्मचारीवर्ग, खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ, कम्पाऊंडर, पॅरामेडिकल स्टाफ, लॅबोरेटरीमधील स्टाफ, रिशेपषनिस्ट, अॅबुलन्स ड्रायव्हर, डाॅक्टरांचे चे ड्रायव्हर, मेडिकल स्टाफ होलसेल व रिटेल, सफाई कर्मचारीवर्ग, दवाखान्यात स्वयंपाक करणार्या मावशी,
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, वैद्यनाथ मंदिर मधील खाजगी सुरक्षा रक्षक,थर्मल पाॅवर स्टेशन मधील कंञाटी कर्मचारीवर्ग, परळी शहरातील सर्व बँकेचे सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड), सिमेंट फॅक्टरीतील कर्मचारीवर्ग, खाजगी, असंघटित क्षेत्रातील सर्व कर्मचारीवर्ग, बांधकाम मजुर, हॉटेल्स मधील कर्मचारीवर्ग,
शेतमजूर, तसेच शहरातील विविध घटकातील कामगार वर्ग यांना शासकीय नियमानुसार वेतन व ईतर सोयी सुविधांबाबत, मागण्यांबाबत, पाठपुरवठा करण्यासाठीच येणाऱ्या पुढील नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी मला जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे मी आपला आयुष्यभर सेवक म्हणून काम करत ऋणी राहील.