विशेष प्रतिनिधी-बुलढाणा
बुलढाणा:-बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांच्याविविध समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेले भारत सरकार नोंदणीकृत भारत सरकार माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या सिंदखेडराजा तालुका सल्लागारपदी मलकापूर पांग्रा येथील ॲड. लुकमान शेख यांची नव्याने नियुक्ती झाल्याचे पत्र ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी दिले आहे.
तसेच विदर्भ अध्यक्ष राजेंद्र लहाने उपाध्यक्ष राजू जाधव जिल्हा सचिव शिवाजी मोरे बुलढाणा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुनील अंभोरे जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे जिल्हा कोषाध्यक्ष समाधान सरकटे जिल्हा सदस्य विष्णू नवघरे व सिंदखेड राजा तालुकाध्यक्ष डॉ.गंगाराम उबाळे,विधी सल्लागार एडवोकेट चंद्रकिशोर इंगळे यांच्या मार्गदर्शनातून ही नियुक्ती झाली आहे. ॲड. लुकमान शेख यांचा वकिली पेशा असून सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात दांडगा अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या याकामाचा नक्कीच जनतेच्या तसेच ग्राहकाच्या समस्या सोडवण्यासाठी फार मोठी मदत व फायदा होणार आहे.
माझी निवड सिंदखेडराजा तालुका सल्लागारपदी केल्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे तसेच विदर्भ अध्यक्ष राजेंद्र लहाने वसर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचे माझ्यावर विश्वास टाकून जबाबदारी दिल्याबद्दल मनापासून आभार मानले आहे, व निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या मित्रमंडळी व शुभचिंतकांचे मनापासून खूप खूप आभार. ग्राहक संरक्षण क्षेत्रात जागरूकता निर्माण करून मी ग्राहकांच्या हितासाठी नेहमी तत्पर राहून ग्राहकांच्या समस्या निवारण करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहील,अशी ॲड. लुकमान शेख यांनी ग्वाही दिलेली आहे या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालुका सल्लागारपदी निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्यातून तसेच मलकापूर पांग्रा पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.