
‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या सोहळ्याच्या तयारीची आज ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा-दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धीमहामार्ग लोकार्पण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत समृद्धी महामार्गाचे होणारे लोकार्पण हा राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.