दोन जनसंपर्क कार्यालयांचे करणार उद्घाटन
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई – भाजपा विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर हे उद्या रविवारी मीरा-भाईंदर शहरात असणार आहेत. भाईंदर पूर्व मंडळ महिला मोर्चा व नवघर मंडळ अशा दोन जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन दरेकरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर दरेकर हे मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
भाईंदर पूर्व येथील दोन जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन सायंकाळी ४ च्या सुमारास विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून भाजप महाराष्ट्र सचिव अॅड. अखिलेश चौबे, आमदार गीता जैन, ठाणे विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवी व्यास, महिला जिल्हा अध्यक्षा रीना मेहता, राजस्थान प्रकोष्ठ प्रदेश संयोजक सुरेश शाह, जैन प्रकोष्ठ प्रदेश संयोजक संदीप भंडारी यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निमंत्रक शिखा भटेवडा व संदीप अग्रवाल यांनी दिली. तसेच या सोहळ्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही शिखा भटेवडा व संदीप अग्रवाल यांनी केले आहे.