Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रमदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 10: आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.

विविध शासकीय कामाच्या निमित्ताने नागरिकांची, अभ्यागंताची सतत येजा सुरू असते. त्यामुळे त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावे, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून श्रमदान करण्यात आले. जिल्ह्यातील इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नेरी येथे सलुन व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील सलुन व्यवसायीकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि …

वरोरा येथे शिवसैनिकांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved