Breaking News

पुणे येथील राज्य क्रीडा स्पर्धा करीता खेळतील चिमूर चे मूकबधिर विद्यार्थी

चंद्रपूर येथील स्पर्धेत मिळविले सिल्वर मेडल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चंद्रपूर येथे झालेल्या दिव्यांग क्रीडा स्पर्धेत चिमूरच्या मुकबधीर विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल प्राप्त करीत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा करीता स्थान मिळविले,समाज कल्याण जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत दिनांक ८/१२/२०२२ रोजी दींव्यांग दीन साजरा करण्याकरिता दींव्यांग विद्यार्थ्यांच्या विशेष शाळा तसेच कर्मशाला शाळेच्या क्रीडा स्पर्धां तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, यात राष्ट्रांत तुकडोजी मुक बधीर विद्यालय चिमूर या शाळेतील मनीकर्निका मनोज गायकवाड वर्ग आठ ते बारा वयोगटात लांब उडी आणि ५० मिटर धावण्याच्या रेसिंग मधे दुसरे स्थान प्राप्त झाले.

त्याकरिता लांब उडी आणि धावण्याच्या रेसिंग करीता सिल्वर मेडल ने सन्मानित करण्यात आले, नयन माणिक शेंडे यांनी पण आठ ते बारा वयोगटात लांब उडी मधे प्रावीण्य प्राप्त करीत सिल्वर मेडल प्राप्त केले, राष्ट्रांत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालय चिमूरचे मनीकर्निका मनोज गायकवाड व नयन माणिक शेंडे यांची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे करीता झाली आहे,यांचे सर्व श्रेय मुख्याध्यापक रामदास कामडी, शिक्षक धर्मदास पानसे, भूपेंद्र गरमडे, शिक्षिका श्रुती मुन, तसेच उद्धव खोब्रागडे, ताराचंद बोरंकुटे, अशोक विभुते, पटवारी कोहपरे, राजू बनसोड, दिलीप उरकुडे, दिलीप चौधरी, चंद्रभागा वांढरे, यांना दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved