
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-झाडीबोली साहित्य मंडळ,शिक्षक साहित्य संमेलन संस्था व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने निमंत्रितांचे कविसंमेलन चिमूर येथील पंचायत समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात १८ डिसेंबरला आयोजित केले आहे.कविसंमेलनाचे उद्घाटन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूपेश पाटील यांचे हस्ते होणार असून कविसंमेलनाचे अध्यक्ष भद्रावती येथील प्रसिद्ध कवी व लेखक डॉ. सुधीर मोते भूषवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून चिमूर पं.स.चे गट विकास अधिकारी राजेश राठोड, गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट, कवी प्रल्हाद बोरकर, कवयित्री डॉ. अश्विनी रोकडे उपस्थित राहणार आहेत.
कविसंमेलनात चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील कवी आपल्या बहारदार कविता सादर करणार आहेत. निमंत्रित कवींमध्ये कवी नरेंद्र कन्नाके, मंगेश जनबंधु, पंडीत लोंढे, नीरज आत्राम, प्रवीण आडेकर, माधव कौरासे, संतोष उईके, लक्ष्मण खोब्रागडे, दुशांत निमकर, नेताजी सोयाम, बेनिराम ब्राम्हणकर,सु.वि. साठे,खुशालदास कामडी, डॉ. ज्ञानेश हटवार, गौतम राऊत, जितेश कायरकर, वसंतराव गिरडे, दिनेश राठोड, सोनाली सहारे, अमरदीप लोखंडे, नंदिनी कन्नाके, सीमा वैद्य, गणेश पेंदोर,परमानंद तिराणिक, संतोष मेश्राम, केशनी हटवार, सुकेशिनी बोरकर आदिंचा समावेश आहे.
कविसंमेलनाचे सूत्रसंचालन राजुरा येथील कवी वीरेनकुमार खोब्रागडे,कवी प्रकाश मेश्राम करणार आहेत. कविसंमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश डांगे,प्रकाश कोडापे तथा झाडी बोली साहित्य मंडळ, शिक्षक साहित्य संमेलन संस्था व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या पदाधिकारी तथा सदस्यांनी केले आहे.