
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रका, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई:-हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त काल रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी रायगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान व आदिवासी पाड्यात कांबळचे वाटप करण्यात आले. हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्था आणि समस्त उतेकर-सकपाळ भावकी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी उतेकर – सकपाळ भावकीचे सर्व सभासद एकत्र येऊन समाज ऊपयोगी कार्यक्रम घेतात. तसेच दरवर्षी हे सर्व तरुण महाबळेश्वर येथील तापोली या गावी उत्तेश्वराची जत्रे वेळी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करतात.
यावर्षी संस्थेला ७ वर्ष पुर्ण झाली त्यानिमित्त सर्व सभासदांनी एकत्र येऊन रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. तसेच आदिवाशी पाड्यात कांबळ वाटप करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. युवराज सकपाळ यांच्यासह संपत उतेकर, प्रकाश उतेकर, रामदास उतेकर, अरुण उतेकर, सचिन उतेकर, मनीष उतेकर, समीर उतेकर, संदिप उतेकर, गणेश उतेकर, सुधीर उतेकर, महेश उतेकर, महेंद्र उतेकर, गणेश उतेकर, अजय उतेकर, अनिल उतेकर, चंद्रकांत उतेकर, मुकुंद उतेकर, योगेश उतेकर, सुनील उतेकर आदी पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.